भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसचा दणदणीत विजय

कसब्यात रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी
Edited by: ब्युरो
Published on: March 02, 2023 12:21 PM
views 567  views

पुणे : तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे.