
वैभववाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज शहरातील कार्यालयात सायंकाळी मुलाखती होणार आहेत.पालकमंत्री नितेश राणे स्वतः या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.त्यामुळे कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात भाजपाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती होणार आहेत.स्वत: नितेश राणे इच्छुकांशी वन टू वन बोलणार आहेत.मुलाखती देण्यासाठी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची कार्यालयात गर्दी झाली आहे.तसेच नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सा-यांना लागून आहे.














