
सिंधुदुर्ग : व्यवसाय उभा करण्याची जिद्द असली, तरी आर्थिक पाठबळाअभावी अनेकांच्या स्वप्नांना मर्यादा येतात. मात्र , योग्य वेळी मिळणाऱ्या कर्जामुळे एखाद्या छोट्या व्यवसायाला मोठ्या स्वरूपात नेऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावंतवाडी इन्सुली येथील सुयश गुळेकर यांची गणपती शाळा. जिल्हा बँकेकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्याचा योग्य वापर करत त्यांनी आपल्या गणपती शाळेचा विस्तार केला असून आज ही गणपती शाळा अधिक मोठ्या स्वरूपात उभी राहिली आहे.

पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्जपुरवठा वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केवळ पारंपारिक व्यवसायांपुरता कर्जपुरवठा मर्यादित न ठेवता, ज्यांच्याकडे व्यवसायाची कल्पना, कौशल्य आणि मेहनतीची तयारी आहे, अशा विविध घटकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सुयश गुळेकर यांची गणपती शाळा आहे. सुरुवातीला छोट्या जागेत त्यांनी ही शाळा सुरु केली. कमी प्रमाणात मुर्त्या बनवत होते. त्यांना शाळेचा विस्तार वाढवायचा होता. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या अर्थसाहाय्याचे मोठे आव्हान होते. अशा वेळी जिल्हा बँकेकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्याने गुळेकर यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली.

कर्जाच्या माध्यमातून छोट्या स्वरूपातील या शाळेने आज मोठी झेप घेतली आहे. आज त्यांच्या गणपती शाळेचे स्वरूप विस्तारले असून, त्यामागे मेहनतीसोबतच योग्य वेळी मिळालेल्या जिल्हा बँकेच्या आर्थिक पाठबळाची महत्त्वाची भूमिका आहे.
ताजी बातमी
View all












