LIVE UPDATES

इन्सुलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 07, 2026 22:13 PM
views 40  views

सावंतवाडी : इन्सुली-धुरीवाडी येथील केतन मनोहर गावकर (वय २१) याने राहत्या घरातील गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे. दुपारी त्याचे आजोबा सुभाष गावकर यांना नातू गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना बोलावून बांदा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर इन्सुली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.