
देवगड : खोकल्याचे औषध समजुन तणनाशक प्राशन केल्यामुळे प्रकृती अस्वस्थ झालेल्या अनुराधा वसंत शिंदे(६४) रा.शिरगाव शिंदेवाडी यांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना दि. ६ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अनुराधा शिंदे यांनी दि ५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले होते.त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.उपचार सुरू असताना ६ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला.
याबाबतची खबर त्यांचे जावई संकेत सत्यवान जोईल(३६) रा.खाकशी तिठा यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.तपास पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक करीत आहेत.











