LIVE UPDATES

बाल शिवाजी स्कूलमध्ये योग दिन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 15:36 PM
views 12  views

कणकवली : कणकवली मध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्त्व, मानसिक स्वास्थ्य आणि वेळेचे नियोजन याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.

योग दिनानिमित्त स्नेहा दामोदर खानोलकर (आयुष मंत्रालय – हेल्थ, थर्ड लेव्हल) यांनी विद्यार्थ्यांना ध्यान (Meditation) तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यांनी बी.एस्सी. (फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल) ही पदवी प्राप्त केली असून, विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले.यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी Rtn. अनघा (Counselling Psychologist, Wellness & Corporate Trainer) यांचे दोन तासांचे प्रेरणादायी अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी Time Management आणि Stress Management या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करत अभ्यासाचे नियोजन, तणावावर मात करण्याचे उपाय आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक कौशल्ये याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन  बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सचिव सुरेखा राणे  यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रणाली सावंत उपस्थित होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा  यशस्वीरित्या पार पडला.

याचबरोबर मुक्तांगण प्री-प्रायमरी स्कूल येथेही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लहान विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली.