LIVE UPDATES

नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त देवगड ग्रामीण रुग्णालयात सेवाभाव

गणेश राणे-अमोल लोके यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 16:47 PM
views 15  views

देवगड : मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांच्या वतीने देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय विटकर, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, विष्णू घाडी, स्नेहा अनुभवणे, संजना लाड, अंकुश ठुकरुल, गटविकास अधिकारी निलेश जगताप, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजयकुमार जोशी, तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण, संतोष बिर्जे, महेश ताम्हणकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

फळवाटप उपक्रमादरम्यान ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांना भेट देण्यात आली. रुग्णकक्ष, डायलिसिस कक्ष, प्रसूती कक्ष तसेच इतर विभागांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी रुग्णांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पडेल येथील साई सुधीर हेमले हा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी शाळेच्या गेटजवळ सरपटणाऱ्या प्राण्याच्या चाव्यामुळे उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. शिक्षकांनी प्रसंगावधान राखत त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आवश्यक त्या सर्व उपचारांची माहिती घेतली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने देवगड तालुक्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, फळवाटप, आरोग्यविषयक उपक्रम आदी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.