
सावंतवाडी : कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, कोलगाव यांच्या वतीने सोसायटीच्या सभागृहात नाबार्ड (NABARD) मार्फत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमासाठी नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण विकास, सहकार क्षेत्रातील नव्या संधी, शासनाच्या विविध विकासात्मक योजना तसेच सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येणारे व्यवसाय व उपजीविका वृद्धी उपक्रम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलंय.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी, शाश्वत व्यवसाय उभारणीसाठी तसेच सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरला.











