LIVE UPDATES

मंत्री नितेश राणेंसाठी कुणकेश्वर मंदिरात अभिषेक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 16:56 PM
views 20  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज देवगड तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने विशेष अभिषेक करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी यश लाभावे, अशी प्रार्थना भगवान श्री कुणकेश्वर चरणी करण्यात आली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या अभिषेक कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

यावेळी देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री कुणकेश्वर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा आणि अभिषेक करण्यात आला. उपस्थितांनी मंत्री नितेश राणे यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, प्रशासक सरपंच महेश ताम्हणकर, प्रमोद आंबेरकर, प्रमोद चव्हाण, राजेश चव्हाण, रामू तेली, उदय पेडणेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते