LIVE UPDATES

राकेश राणेंकडून उपजिल्हा रुग्णालयाला टेबल फॅन

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 16:52 PM
views 153  views

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायतीचे  नगरसेवक राकेश राणे यांच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुविधेसाठी टेबल फॅन भेट देण्यात आले. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना उष्णतेच्या वातावरणात दिलासा मिळावा आणि त्यांची गैरसोय टाळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

यावेळी भाजप  शहराध्यक्ष अण्णा उर्फ सुरेंद्र कोदे, नगरसेवक संजय कामतेकर, माजी नगरसेवक रवींद्र गायकवाड माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे, औदुंबर राणे, पंकज पेडणेकर, महेश सावंत, चारुदत्त साटंम, अभय राणे, प्रशांत सावंत, मिथुन ठाणेकर, शिवसुंदर देसाई,  तसेच बाळा पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रुग्णालयाला टेबल फॅन भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.