
सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमातून सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर होणारा विजय अधोरेखित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कॅडेट आराध्य नाटेकर याने साकारलेली प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली. प्रभू श्रीराम यांची वेशभूषा परिधान करून त्याने त्यांच्या शौर्य, शिस्त आणि सत्यनिष्ठा या गुणांचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. रावण दहनाच्या माध्यमातून अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्तींचा शेवटी पराभव आणि धर्माचा विजय होतो, हा संदेश देण्यात आला. सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, धैर्य, चारित्र्य आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. विजयादशमीच्या या सोहळ्याने या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभू श्रीराम यांच्याप्रमाणेच सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा यामुळे कॅडेट्सना मिळाली.
ताजी बातमी
View all










