
देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत यश संपादन करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सार्थक दीपक घाडी याने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर करण सुरेश कदम याने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. याच वयोगटातील मुलींच्या गटात शुभ्रा सचिन धावडे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात गार्गी गणेश बाईत हिने ४०० मीटर हार्डल्स प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला, तर सृष्टी गणेश लब्दे हिने याच प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात सर्वेश रामदास तेली याने ११० मीटर हार्डल्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे खेळाडू सार्थक घाडी, करण कदम, शुभ्रा धावडे आणि गार्गी बाईत तसेच द्वितीय क्रमांक मिळविणारी सृष्टी लब्दे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक बाळासाहेब ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रकांत घाडी, संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम तेली, सचिव संकेत लब्दे, खजिनदार रावजी वाळके, संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक संजय राणे, कुणकेश्वर केंद्रप्रमुख देवकी शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








