
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि उमाबाई बर्वे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयानजीक असलेल्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत स्पर्धकांना ज्येष्ठ साहित्यिक कुमुद रेगे यांच्या कोणत्याही एका साहित्यकृतीचे परीक्षण दहा मिनिटांत सादर करायचे आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०१, ३५१ आणि ३०१ रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना कुडाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
तरी वाचनप्रेमी आणि इच्छुक स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर असून, इच्छुकांनी उमाबाई बर्वे ग्रंथालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ९४२२६०२१६० या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर आणि सचिव सीताराम पाटील यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all









