LIVE UPDATES

हिंदळे येथे २४ नोव्हेंबरला श्री कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रा

कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राचा दुर्मिळ योग; पहाटे २.०२ ते रात्री ८.२३ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाची संधी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 06:34 PM
views 175  views

देवगड : हिंदळे येथील श्री कार्तिक स्वामी मंदिरात मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा विशेष योग यानिमित्ताने जुळून आला आहे. पहाटे २ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत हा दर्शनाचा कालावधी असणार आहे.

या विशेष योगाच्या निमित्ताने श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी हिंदळे येथील मंदिरात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. श्री कार्तिकस्वामी मंदिर देवस्थान, हिंदळे यांच्या व्यवस्थापनाने या दर्शन योग यात्रेचे आयोजन केले असून, भाविकांनी उपलब्ध कालावधीत दर्शनासाठी सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे.