LIVE UPDATES

झोळंबेचे माजी सरपंच सतीश कामत यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 19:01 PM
views 75  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : झोळंबे गावचे माजी सरपंच, तसेच तळकट-झोळंबे सहकारी सोसायटीचे माजी संचालक आणि सावंतवाडी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक सतीश यशवंत कामत यांचे मंगळवारी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने झोळंबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 सतीश कामत यांनी झोळंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी योगदान दिले होते. तसेच सहकार क्षेत्रातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते ‘आत्मा’ समिती, दोडामार्गचे माजी सदस्य होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्यावर बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.