LIVE UPDATES

साळशी हायस्कूलात रानभाजी पाककला स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 14:24 PM
views 103  views
#kokansadlive#news update#konkan update#

​देवगड : तालुक्यातील साळशी ग्रामविकास मंडळ साळशी संचलित, माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांतर्गत गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली 'रानभाजी व पालेभाजी विद्यार्थी पाककला स्पर्धा' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडली. स्थानिक व आरोग्यदायी रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. ​

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात विविध प्रकारच्या स्वादिष्ट, चविष्ठ आरोग्यदायी व पारंपरिक रानभाज्या व पालेभाज्या तयार करून परीक्षकांसमोर सादर केल्या. यामध्ये चव, सादरीकरण आणि स्वच्छतेच्या निकषांवर आधारित जाहीर झालेला अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे:

प्रथम क्रमांक (विजेता गट)

गट क्रमांक ८ – मिथुन मणचेकर, धिरज घाडी, पारस वरेरकर व पार्थ पारधी 

(आपल्या उत्कृष्ट पाककृती आणि उत्तम सादरीकरणाच्या जोरावर या गटाने प्रथम क्रमांकावर नाव कोरले. द्वितीय क्रमांक:

गट क्रमांक ६ – संचित घाडी, सोहम घाडी आणि यश मोंडकर, ​तृतीय क्रमांक:

गट क्रमांक १ – आर्या राणे, चंदना राणे आणि नताशा मोंडकर, ​उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक : गट क्रमांक ११ – समर्थ साटम आणि भूषण देवणे, ​उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक: गट क्रमांक ३ – सानवी राणे , राणे नम्रता आणि वेदिका राणे. ​एकूण ३४ विद्यार्थ्यांचा सहभाग व ११ गटांची चुरस झाली. 

या पाककला स्पर्धेत शाळेतील ३४ विद्यार्थ्यांनी ११ वेगवेगळ्या गटांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्या आणि पालेभाज्यांचे पदार्थ तयार करण्यासाठी मोठी तयारी केली होती. दुर्मिळ रानभाज्यांची माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांची पारंपरिक पद्धतीने केलेली मांडणी यांमुळे उपस्थितांची व परीक्षकांची विशेष दाद मिळाली.

स्कॉलरशिप परीक्षेत साळशी केंद्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका स्मिता कोदले  यांचा या प्रसंगी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावुक व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. मनःपूर्वक अभिनंदन केले.परीक्षक व प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.  स्मिता कोदले  सौ.  श्रेया धुळप यांनी चांगल्याप्रकारे काम पार पाडले. त्यांनी प्रत्येक गटाच्या पदार्थांची चव घेऊन तसेच त्यांच्या स्वच्छतेची व सादरीकरणाची नोंद घेऊन निकाल घोषित केला.

 या प्रसंगी केंद्रप्रमुख साळशी चे सुनील कोदले,  आणि मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे मुख्याध्यापक संजय मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.​स्पर्धेचे नियोजन पुरुषोत्तम साटम यांनी केले. 

 ​कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिपिक स्वप्निल भरणकर, शिपाई,  सदाशिव भिसे आणि ग्रामस्थ दिनेश सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.

 ​स्पर्धेच्या शेवटी सर्व विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक व आरोग्यदायी आहाराबद्दल विशेष जनजागृती निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.