
वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नितीन मांजरेकर यांच्या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.










