
वेंगुर्ला : शिवशाही परुळे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला नागरिक, स्पर्धक आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, मच्छीमार नेते वसंत तांडेल, वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे उपसरपंच प्राजक्ता पाटकर, तसेच चेतन सामंत, महेश सामंत, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, महादेव साफळे, साईनाथ माडये, आनंद गावडे, नगरसेवक प्रणव वायगणकर, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, सीमा सावंत, सुवर्णा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते अण्णा सावंत, सोमेश सावंत, अण्णा पाटकर, राजेश चव्हाण, भूषण पाटकर, रुपेश लांबर, संदीप लांबर, सुनाद राऊळ, राजू शिरसाट, जयवंत राऊळ यांच्यासह सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ, नागरिक, स्पर्धक आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
नारळ लढविणे स्पर्धेत प्रथम क्रमांक बबलू लांबर, द्वितीय क्रमांक चव्हाटा कोचरा, तृतीय क्रमांक प्रियांश तळवडेकर, तर चतुर्थ क्रमांक बबलू शिरसाट यांनी मिळविला. यावेळी MPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धेश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मनीष दळवी यांनी आयोजक मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. गावातील पारंपरिक कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती द्यावी, युवकांनी उद्योजकतेकडे वळून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रसाद पाटकर यांनी केले. उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे परुळे परिसरात पारंपरिक खेळाची रंगत पाहायला मिळाली.










