
दोडामार्ग : ई पी सी प्रकल्प कोल्हापूर - चंदगड - दोडामार्ग - आस्नोडा मार्गावरिल ग्रामपंचायत साटेली - भेडशी बाजारपेठ हद्दितून जाणा-या प्रकल्पाच्या बांधकामाच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिक, व्यापारी व ग्रामपंचायत यांच्याशी रस्ता लाईन आऊट, रचना, रूंदीकरण व इतर रस्ता बांधकामाबाबत माहिती विषयावर बैठक व सविस्तर चर्चा होणेबाबत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य गणपत डांगी यांनी कार्यकारी अभियंता एम एस आय डी सी कार्यालय कार्यकारी अभियंता मुंबई यांच्याकडे लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले.
त्यांनी दिलेल्या लेखी पत्रात ई पी सी प्रकल्प कोल्हापूर - चंदगड - दोडामार्ग - अस्नोडा मार्गावरिल ग्रामपंचायत साटेली - भेडशी बाजारपेठ हद्दितून जाणा-या प्रकल्पाच्या बांधकामाच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिक, व्यापारी व ग्रामपंचायत यांच्याशी रस्ता लाईन आऊट, रचना, रूंदीकरण व इतर रस्ता बांधकामाबाबत माहिती विषयावर बैठक व सविस्तर चर्चा होणे गरजेचे होते मात्र अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांमध्ये अनेक गैरसमज आहेत. सदर रस्ता सिमेंट काॅंक्रिटचा आहे किंवा डांबरीकरण कामाचा आहे. नियोजित रस्ता हा किती मीटरचा असेल. ( मुख्य रस्ता किती मीटरचा आहे, साईड पट्टि किती मीटरची आहे . गटार किती मीटरचे आहेत. ) ग्रामस्थ व व्यापा-यांना रस्ता रूंदिकरणात बाधित होणा-या जागा व इमारत इतर बांधकामाची नुकसान भरपाई मिळणार आहे कि नाही ? नियोजित रस्त्यावरती गतिरोधक कोणत्या ठिकाणी बसवणार आहात. माहिती फलक , क्राॅस गटार , रस्ता दुभाजक ( डिव्हायडर ) , रस्त्यावरिल सार्वजनिक विद्युत लाईट, सोलर पॅनल हाय मास्ट , शिडी लाईन मार्किंग , पादचारी मार्ग , सि.डी.वर्क , बस थांबा , या मार्गावर ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बदलण्याची आवश्यकता आहे आदी असे अनेक प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाले आहेत. तसेच पावसाळ्यापुर्वी चांगला सुस्थितीत असलेला रस्ता उखडून टाकला आहे, त्याची कारणे मिमांसा काय आहे याबाबतची माहिती ग्रामस्थांना जाणून घ्यायची आहे.
ग्रामस्थ व्यापारी बांधवाना रस्ता महत्वाचा पण अनभिज्ञ का ठेवले जाते ?
बाजारपेठ व दळणवळणच्या दृष्टीने गोवा कर्नाटक कोल्हापूर तसेच आदी मोठी शहरे याना जोडणारा हा मार्ग दुपदरीकरण आवश्यक आहेच पण बाजारपेठेतील व्यापारी नागरिक किंवा तालुक्यातील जनता यांना सदर नियोजित रस्त्याचे स्टक्चर माहीत नाही लगतच्या ग्रामपंचायतीना सुद्धा रस्ता नियोजनाचा मॅप किंवा माहिती देण्यात आली त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये येऊन विचारणा करतात तेव्हा लोकप्रतिनिधीना योग्य उत्तर देता येत नाही काम बंद केल्यावर काम अडविले जाते अशी एक बाजू प्रशासनासमोर दिसेल मात्र एवढ्या मोठ्या रस्त्याबाबत ग्रामस्थांना अनभिज्ञ का ठेवले जाते याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
तहसीलदार पोलीस प्रशासनाने घालावे लक्ष
एवढ्या मोठ्या रस्त्याबाबत काम सुरू झाल्यानंतर त्याचे रुंदीकरण नुकसानभरपाई रस्ते निर्माण कालावधी मर्यादा याबाबत सदर ठेकेदाराने माध्यमांसमोर येत रस्त्याचा आराखडा जाहीर करणे आवश्यक आहे समनव्य ची भूमिका म्हणून तहसीलदार व पोलीस प्रशासनाने सदर ठेकेदाराला सूचना देण्याची मागणी श्री.डांगी यांनी केली आहे.तसेच स्थानिक ग्रामपंचायत ग्रामस्थ व्यापारी यांची ही संयुक्त बैठक घेणे गरजेचे असल्याचे श्री डांगी यांनी सांगितले.












