
दोडामार्ग : आवाडे (ता. दोडामार्ग) येथे बिगर परवानाधारक दारू ताब्यात बाळगल्याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार जॅक्सन घोन्साल्विस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मार्शल झुजे फर्नांडिस (वय 62, रा. आवाडे) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 178/2025 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी २ ते २.१५ या वेळेत कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एकूण ६२०० रुपयांची गोवा बनावटी इंग्रजी दारू जप्त करण्यात आली. त्यामध्ये हनीग्रेड ब्रँडीच्या ३९ बाटल्या त्यांचं मूल्य अंदाजे ₹३९००/-, हायवूड फाईन व्हिस्कीच्या २३ बाटल्या (मूल्य अंदाजे ₹२३००/- असा माल समाविष्ट आहे.
या कारवाईचा तपास पोहेकॉ देसाई करीत आहेत तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला हवालदार गवस यांनी पूर्ण केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












