LIVE UPDATES

Sawantwadi News : जयेंद्र परुळेकरांना शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार ?

अमेय पै यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 03:44 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : ओंकार हत्तीला वनतारात पाठवण्याचा सत्ताधा-यांचा डाव म्हणणा-या डॉ. जयेंद्र परुळेकरांना शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमेय पै यांनी केला आहे. तथाकथित पर्यावरणवादी डॉ. परुळेकर यांनी  पर्यावरणाच्या संवंर्धनासाठी आतापर्यंत काय केले ? असा सवाल श्री. पै यांनी केला. 

श्री. पै म्हणाले, पर्यावरणाच्या नावाखाली सेटलमेंट करणारे हे पर्यावरणवादी आहेत. ओंकार हत्तीला वनतारात पाठवण्यासाठी जयेंद्र परुळेकर यांचा नेमका विरोध का ? अंबानींना विरोध करून त्यांच्या लग्नात ठुमके लावणाऱ्या यांच्या नेत्यासारखी डॉ. परुळेकर यांची दुटप्पी भुमिका आहे.  दोन महिन्याच्या कालावधीत ओंकार हत्तीने असंख्य वाहनाचे तसेच भातशेती, नारळ, केळी बागायतीचे अतोनात नुकसान केले.

शेतकऱ्यांचे अश्रू, वेदना या तथाकथित पर्यावरणवाद्यांना काय कळणार ?  असा सवाल त्यांनी केला. पर्यावरणवाधी स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्याना नुकसान भरपाई देणार असतील तर त्यांनी केलेला विरोध बरोबर आहे. पण, जर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी हा मोगम शब्द वापरून पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात लिहित असतील तर पालकमंत्री यांनी वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केलेली आहे.

त्यमुळे ओंकार ला वनतारात न्या, नाहीतर हत्तीच्या कळपात नेऊन सोडा. पण, सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून आम्हाला मुक्त करा असे आवाहन निरवडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांनी केले आहे.