LIVE UPDATES

Leopard Cub Rescued : वेळंब येथे आढळले बिबट्याचे पिल्लू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 04:42 PM
views 36  views
Four to five-month-old female leopard cub rescued by the Forest Department near Shringartali-Abloli road in Guhagar, Ratnagiri.

गुहागर : तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) येथील शृंगारतळी ते आबलोली रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू आढळले. वनखात्याने या पिल्लास सुरक्षितरित्या बचावकार्य करून ताब्यात घेतले. हे बिबट्याचे पिल्लू चार ते पाच महिन्याचे आहे, अशी वन खात्याने माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळकृष्ण ओक यांनी रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती दिली. त्यानंतर वन खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य करून पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी श्री. जानवले यांच्याकडून तपासणी केली. बिबट्याचे पिल्लू सुस्थितीत असल्याची खात्री केली. पिल्लाचे वय अंदाजे चार ते पाच महिने आहे. बिबट्याचे पिल्लू मादी आहे.

बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमित निमकर, वनरक्षक श्री. गायकवाड, श्री. मांडवकर, श्री. पवार यांनी केले.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग महिला काथ्या क्लस्टरच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची भेट
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Adali MIDC Sindhudurg : आडाळीतील भूखंडधारक उद्योजकांसाठी कार्यशाळेची मागणी
November 23, 2026
Successful spinal tumour surgery at Walawalkar Hospital in Chiplun helps a 42-year-old wheelchair-bound patient walk again.
Success story : पाठीच्या कण्यातील गंभीर ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
"बकुळीची फुले" काव्यसंग्रहाला 'श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार' जाहीर
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग महिला काथ्या क्लस्टरच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची भेट
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Adali MIDC Sindhudurg : आडाळीतील भूखंडधारक उद्योजकांसाठी कार्यशाळेची मागणी
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
"बकुळीची फुले" काव्यसंग्रहाला 'श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार' जाहीर
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Mother Queens English School Sawantwadi : मदर क्वीन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांमध्ये यश
November 23, 2026