LIVE UPDATES

"बकुळीची फुले" काव्यसंग्रहाला 'श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार' जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 04:20 PM
views 7  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी :  कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या "बकुळीची फुले" काव्यसंग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा 'श्रि दा ग्रंथ पुरस्कार' जाहीर झाला आहे. १२ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. दीपक पटेकर यांच्या बकुळीची फुले या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे.

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. या विचारातूनच या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली गेली.या वर्षी या स्पर्धेला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. अनुवादीत, शैक्षणिक, कथासंग्रह,

कवितासंग्रह, कादंबरी, नाटक, चरित्र, वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांतील अनेक उत्तमोत्तम पुस्तके या स्पर्धेसाठी प्राप्त झाली. आलेल्या प्रत्येक ग्रंथाचा दर्जा इतका उंचावलेला असल्याने त्यातून सर्वोत्कृष्ट कलाकृती निवडणे हे परिक्षक मंडळासाठी फार मोठे आव्हान होते.

परिक्षकांनी अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने प्रत्येक पुस्तकाचे वाचन व मूल्यांकन करून साहित्याची भाषाशैली, आशयघनता, मांडणी आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम या निकषांवर  'श्रि दा ग्रंथ पुरस्कार' जाहीर केले आहेत. "बकुळीची फुले" काव्यसंग्रहाला मिळालेला पुरस्कारासाठी दीपक पटेकर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Four to five-month-old female leopard cub rescued by the Forest Department near Shringartali-Abloli road in Guhagar, Ratnagiri.
Leopard Cub Rescued : वेळंब येथे आढळले बिबट्याचे पिल्लू
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Adali MIDC Sindhudurg : आडाळीतील भूखंडधारक उद्योजकांसाठी कार्यशाळेची मागणी
November 23, 2026
Successful spinal tumour surgery at Walawalkar Hospital in Chiplun helps a 42-year-old wheelchair-bound patient walk again.
Success story : पाठीच्या कण्यातील गंभीर ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Mother Queens English School Sawantwadi : मदर क्वीन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांमध्ये यश
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Four to five-month-old female leopard cub rescued by the Forest Department near Shringartali-Abloli road in Guhagar, Ratnagiri.
Leopard Cub Rescued : वेळंब येथे आढळले बिबट्याचे पिल्लू
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Adali MIDC Sindhudurg : आडाळीतील भूखंडधारक उद्योजकांसाठी कार्यशाळेची मागणी
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Mother Queens English School Sawantwadi : मदर क्वीन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांमध्ये यश
November 23, 2026
Museum in Ratnagiri showcasing replicas of 12 historic forts associated with Chhatrapati Shivaji Maharaj, inaugurated by Uday Samant.
Ratnagiri Fort Museum : युनेस्कोच्या वारसा यादीतील १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे भव्य संग्रहालय
November 23, 2026