
कणकवली : कळसुली - देंदोनवाडी येथील हनुमंत नागेश सावंत यांच्या बागायतीमधील ८ हजार ५०० रुपये किंमतीचा पाण्याचा पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा पंप बागायतीमधून धरण पाण्यात सोडण्यात आला होता. चोरीची घटना ३० मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत हनुमंत यांचा भाचा किरण सुधाकर सावंत (कलमठ - बिडयेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











