LIVE UPDATES

भाजपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: June 03, 2026 20:51 PM
views 12  views

सावंतवाडी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने आगामी ५ जून २०२६ रोजी 'जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधून एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सर्वोदयनगर येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेस मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रमोद जठार, प्रमोद कामत जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष, भाजप उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमास, नगरध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले, उपनगरध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन समिती सभापती आनंद नेवगी पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर व सर्व नगरसेवक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वृक्षारोपणासारख्या महत्त्वाच्या उपक्रमाद्वारे निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

 असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर आणि बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांना, तसेच सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.