LIVE UPDATES

वैभववाडी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई पोलिस दलात निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 03, 2026 20:22 PM
views 19  views

वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातील दोन विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झाली आहे. अक्षय मोपेरकर (उंबर्डे) व विठ्ठल संजय गुरव (कोते-राधानगरी) या  विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

रावराणे महाविद्यालयाचे अक्षय व विठ्ठल हे दोन्ही विद्यार्थी मुंबई पोलीस भरतीत उतरले होते. या भरती प्रक्रियेत त्यांनी मैदानी व लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी केली. तसेच एनसीसीचे सी प्रमाणपत्र असल्याने प्रत्येकी ५ बोनस गुणांचाही त्यांना लाभ मिळाला. या अतिरिक्त गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीत महत्त्वपूर्ण फायदा झाला.

 या यशामागे एनसीसीचे प्रशिक्षण, ५८ महाराष्ट्र बटालियनचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयातील शिक्षकांचे सहकार्य त्यांना लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, संस्था पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.