LIVE UPDATES

Kudal News : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगराध्यक्षांकडून बंधारे व जलस्रोतांची पाहणी

परतीच्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी बंधारे उभारणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 18:55 PM
views 23  views

कुडाळ : पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीतील सूचनेनुसार आगामी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शहरातील बंधारे व जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीप्रसंगी मुख्य अधिकारी आणि नगरसेविका नयना मांजरेकर उपस्थित होत्या.

परतीच्या पावसाचा योग्य उपयोग करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शहरात योग्य ठिकाणी दगड-मातीचे छोटे बंधारे उभारणे आणि भूजल पुनर्भरण वाढवणे यासाठी नगरपंचायत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले आहेत.

"पाणी अडवूया, पाणी वाचवूया!" असे आवाहन करत, नागरिकांनी आपल्या परिसरातील ओढे-नाले स्वच्छ ठेवावेत आणि या जलसंधारण मोहिमेत सहभाग नोंदवून पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.