
सावंतवाडी : जनता विरोधकांच्या खोट्या भुलथापांना व खोट्या माहितीच्या सूत्रधारे घेतलेल्या पत्रकार परिषदांना बळी पडणार नाही, हे सावंतवाडीच्या जनतेने निवडणुकीत दाखवून दिले आहे. विकासात्मक कोणतेही धोरण विरोधकांकडे नसल्याने खोटे आरोप करून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत. या प्रवृत्तींना सावंतवाडीची जनता योग्य वेळी उत्तर देईल असा खुलासा पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर राजकीय वैमानस्यातून बीनबुडाचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. बांदेकर म्हणाले, पाणीपुरवठा सभापती म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर कामकाज सुरू असताना ८ जून २०२६ रोजी रु. ७ लाख ५० हजार ७६२ व रु. ९ लाख ८७ हजार ९४४ ही दोन बिले हजर केली गेली. बील आल्यानंतर सरासरी बीले व या बीलांमध्ये फार मोठ्या रक्कमेची वाढ दिसून आली. त्यामुळे या बीलांचा लेखी कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचा ठराव करण्यात आला.
यानंतर पाणीपुरवठा समिती समोर ३ वेगवेगळ्या रकमेचा अहवाल सादर करण्यात आला. ही बाब सभापती म्हणून संशयास्पद वाटली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून हिशोब व ताळेबंद न जुळल्याने मी पाणीपुरवठा समिती सदस्य व सभापती यांनी ८ ऑगस्ट ला वादग्रस्त बीलाबाबत अहवाल सादर केल्यानंतरच बील अदा व्हावे असे सावंतवाडी नगरपरिषद व सावंतवाडी जनतेच्या हिताबाबत विचार करता याबाबत पत्र सर्व समिती सदस्य व मी मुख्याधिकारी यांच्याकडे दिले.
यानंतर १८ ऑगस्ट २०२६ ला नळसामान रजिस्टर व बील यामध्ये तफावत असल्याचे मान्य करून संबंधित कर्मचाऱ्याने पत्र दिले. त्यामुळे हे प्रकरण संबंधित जोडारी कर्मचारी मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून आले आणि दुसऱ्या दिवशी नळसामान रजिस्टर गहाळ झाल्याची बातमी विभाग प्रमुख यांच्याकडून मिळाली. CCTV चेक केले असता संबंधित कर्मचारी रजिस्टर हातळताना व घेऊन जाताना दिसून आला.
हा अहवाल समितीच्या सभेमध्ये विभागप्रमुखांनी सादर केल्यानंतर स्थायी समितीमध्ये पाठवण्यात आला. यावर नगराध्यक्षांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या आधारे प्रशासना मार्फत फिर्यादी पोईपकर यांनी रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे एक जबाबदार लोकप्रतिनिधी व सावंतवाडी न.प.चा पाणीपुरवठा समिती सभापती व सदस्यांनी वेळेचे भान राखत सावंतवाडी नगरपरिषद व जनतेचे नुकसान होऊ नये याकरिता क्षणाचा विलंब न होता बिल अदा होण्यापासून थांबवले व चौकशी लावण्यास आग्रह धरला. त्यामुळे होणारा भ्रष्टाचार थांबला.
आज पर्यंत विवादग्रस्त बील अदा झालेले नाही. मी केलेल्या कामाचे कौतुक करण्यापेक्षा विरोधकांनी समितीच्या सदस्यांना हाताशी धरून कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता संशयाने माझ्यावर राजकीय स्टंट केला व राजकीय वैमानस्यातून मी करत असलेले पारदर्शक काम पचत नसल्याने बीनबुडाचे आरोप करून राजकीय दृष्ट्या खाली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी भाजपा कार्यकर्ता असून माझी विकासात्मक कार्यकर्ता काम करण्याची वृत्ती पाहून मला जनतेने निवडून दिले.
निवडून आल्यानंतर मी जनतेच्या अडचणी सोडवल्या. यांच्याच मुळे सुडबुद्धीने राजकीय हेतू पुरस्कार विरोधक मला या प्रकरणात भोवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. ही बाब जनतेला समजली आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीमागे होती व आजही आहे. मी सावंतवाडी शहराचा नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये विकासात्मक धोरणाकरिता व जनतेच्या हिताकरिता प्रामाणिक हेतूने काम करीत आहे.
सावंतवाडी न.प. मधील भा.ज.प. चे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक अतिशय जोमाने सावंतवाडीच्या विकासाकरिता काम करीत आहेत. त्यामुळे जनतेमधून फार मोठा पाठिंबा भा.ज.प. ला मिळत आहे. मा. द्वेशापोटी विरोधक जाणून बुजून खोटेनाटे आरोप करून प्रकाशझोतात येण्याकरिता सावंतवाडी नगरपरिषद व भाजपाचे नगरसेवक यांना बदनाम करत आहेत अस मत व्यक्त केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










