LIVE UPDATES

विश्वनाथ राणे यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 26, 2026 14:03 PM
views 38  views

कुडाळ : अणाव-वेशीवाडी येथील रहिवासी विश्वनाथ उर्फ भाई रघुनाथराव राणे (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पूर्वी कुडाळ येथे टाईल्स विक्रीचे दुकान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कुडाळ येथील राणे स्पोर्ट्स दुकानाचे मालक सुहास यांचे ते वडील तर कणकवलीतील जॉकी शोरुमचे उदय राणे, ठेकेदार धीरज साटम, देवगडचे आंबा व्यापारी विजय उर्फ बंटी कदम यांचे ते सासरे होत.