LIVE UPDATES

प्रांताधिकाऱ्यांच्या कथित शिवीगाळीचा मनसेकडून निषेध

शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 15:40 PM
views 51  views

देवगड : दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांशी कथितपणे शिवीगाळ करणारे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या वर्तनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), देवगड तालुक्याने जाहीर निषेध केला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, पोलीस पाटील, तलाठी आणि शिक्षक उपस्थित असताना प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कथितपणे शिवीगाळ केली. तसेच, एका संवैधानिक पदावर कार्यरत अधिकाऱ्याने अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसून ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

याचबरोबर, सोमवारी शिक्षक संघटनांकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देणार असून, पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही संतोष मयेकर यांनी दिली.