
रत्नागिरी : कोकणात राजापुरात अणुऊर्जा प्रकल्प आता आला, तर आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू. मी स्वतः हा प्रकल्प येथे व्हावा याच मर्जीचा आहे," जर हा प्रकल्प आधीच झाला असता, तर आज भागाची किती मोठी प्रगती झाली असती!" वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोणीही करावा, "सारखं आंदोलन-आंदोलन काय चेष्टा लावली आहे? विरोध करणाऱ्यांनी हिंमत असेल तर समोरून आंदोलन करावे, मग मी काय करतो ते बघा. कारण किती वेळा समजवायचं!" अशा अत्यंत सडेतोड शब्दांत राणे यांनी प्रकल्पविरोधकांचा समाचार घेत ठाम भूमिका माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मांडली.
प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावर कडाडून टीका करताना ते म्हणाले की, "विरोध करणारे हे कोण आहेत? ते निव्वळ व्यावसायिक आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी विरोध करून पैसे घेतले आणि आता ते गप्प बसले आहेत. अणुऊर्जा प्रकल्प झाला असता तर राज्याला मुबलक वीज मिळाली असती, नोकऱ्या, रोजगार मिळाला असता. असेरत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी राजापूरात पुन्हा आणुऊर्जा प्रक्लप येणार असल्याचे संकेत दिले. त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी पुन्हा-पुन्हा ती री ओढली होती. याबाबत खासदार राणे म्हणाले, आणखी चार दिवस पाऊस पडला नसता तर पाण्या बरोबर आपल्याला वीज देखील मिळाली नसती. अंधारात राहण्याची वेळ आली असती. आणूऊर्जा प्रक्लप झाला असता तर राज्याला पुरेल एवढी वीज निर्मिती झाली असती. त्याला अनुसरून अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झाले असते. हजारो तरूणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. बेरोजगारी दुरू झाली असती. म्हणून जिल्ह्यात प्रकल्प हवाच. जर प्रकल्प पुन्हा येणार असले तर त्याचे आम्ही स्वागत करणार. किती दिवस आणि किती वेळा लोकांना समजवायचे, असा राणे यांनी विरोधकांना सुनावले.
नारायण राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत प्रहार केला. "या प्रकल्पाला विरोध करणारे नेमके कोण होते? उद्धव ठाकरे होते. त्यांनी पैसे खाल्ले आणि ते गप्प बसले. त्यांच्या या राजकारणामुळे प्रकल्प तर गेलाच, पण सोबतच कोकणातील हजारो तरुणांचा रोजगार आणि व्यवसायही हिरावला गेला," असा घणाघाती आरोप राणेंनी केला.










