
देवगड : तालुक्यातील किंजवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, किंजवडे-आरे या संस्थेचे सचिव विश्वनाथ घाडी यांची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय सहकार परिषदेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे किंजवडे गावासह सहकारी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या घाडी यांना राष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या निवडीमुळे किंजवडे परिसरातील सहकार चळवळीला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विश्वनाथ घाडी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








