रवींद्र चव्हाण, फडणवीस नसते तर केसरकर आमदार नसते : विशाल परब

संजू परब संजय राऊतांसारखे, आमच्यासोबतच
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2025 20:18 PM
views 41  views

सावंतवाडी : आजचा दिवस भाजपसाठी आनंदाचा आहे. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे हा विजय आम्ही प्राप्त करू शकलो. विजयाची सुरूवात आम्ही केली आहे. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपला मोठ यश मिळालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपला यश मिळालं आहे असं मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते म्हणाले, सावंतवाडीकर जनतेन भाजपवर प्रेम दाखवत आम्हाला विजयी केल. वेंगुर्ला शहरातही आम्हाला आशीर्वाद दिला. दोन्हीकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेत. तरूण वर्ग बेकार आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे आम्हाला त्यावर काम करायचं आहे. दीपक केसरकर आमच्यासाठी वडीलधारी आहेत. त्यांना आता तरूणांना संधी दिली पाहिजे. इथल्या तरूणांना रोजगार देण्यासाठी, चांगले प्रकल्प आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस नसते तर श्री. केसरकर आज आमदार झाले नसते हे नाकारून चालणार नाही. आम्ही महायुतीतील मंडळी आहोत. यापुढे विकासासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, येणाऱ्या काळात आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपची ताकद आहे. संजू परब यांच्यावर बोलणार नाही. ते आमच्यासोबतच असणार आहेत. संजू परब हे संजय राऊत यांच्यासारखे आहेत. जास्त बोलणार नाही, ते काही गोष्टी मस्करीत बोलतात असंही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगावकर, हितेन नाईक, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.