
सावंतवाडी : मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू, येणाऱ्या ५ वर्षांत जनतेची सेवा करू असं मत शिवसेना नगरसेवक तथा युवा रक्तदाता संघटनेचे उमेदवार दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ६ मधून ५०७ मत घेत त्यांनी विजय खेचून आणला. यानंतर प्रभागात विजयी मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, डॉ. निकिता सुर्याजी, प्रथमेश प्रभू, अनिकेत पाटणकर, मेहर पडते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.












