
सावंतवाडी : लोकांनी बिनापैशांच मला मतदान केल. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पैसे न वाटता माझ्या कामाला लोकांनी संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थकी लावेन असं मत देवा टेमकर यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक ४ मधून उबाठा शिवसेनेचे उमेदवार देवेंद्र उर्फ देवा टेमकर यांनी विजय खेचून आणला. ४४० मत घेत त्यांनी विजय खेचून आणला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रा. देवयानी टेमकर आदी उपस्थित होते.












