
सावंतवाडी : येणाऱ्या काळात विरोधक म्हणून आम्ही काम करू आणि ७ नगरसेवक पुरून उरू असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख विजयी उमेदवार संजू परब यांनी व्यक्त केला. ४८१ च मताधिक्य घेत शिवसेना उमेदवार संजू परब यांनी भाजपच्या माजी नगरसेवक उदय नाईक यांचा दारूण पराभव केला.
दरम्यान, या विजयाच श्रेय माझ्या पत्नी संजना परब, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, गुरू मठकर, दिना नाईक व तमाम मतदारांना देतो अस मत व्यक्त करत मतदरांच प्रेम कधीही विसरणार नाही असं मत व्यक्त केले. तसेच मिठाई पुडे वाटण्यात आम्ही कमी पडलो. अन्यथा, आमचेच उमेदवार विजयी झाले असते असंही ते म्हणाले. यावेळी अशोक दळवी, शिवसेना नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












