
सावंतवाडी : जनतेन आम्हाला कौल दिला आहे. २० वर्षांत सावंतवाडीत काही झालं नाही. नवीन तरुणांना संधी देणं काळाची गरज आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकरांनी याचा विचार करावा असाही टोला भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाणला.
ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच हे यश आहे. प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. सावंतवाडीकरांनी आम्हाला संधी दिली. सावंतवाडीचा विकास करणं हा आमचा मुख्य हेतू आहे. दीपक केसरकर आमच्यासाठी वडीलधारी आहेत. मात्र, त्यांनी आता आराम करून नवीन तरुणांना आशीर्वाद द्यावा असही मत व्यक्त केले. यावेळी सौ. वेदीका परब, ॲड. परिमल नाईक आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












