कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

अपघातात ४ महिलाही जखमी : चालकावर गुन्हा दाखल
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 21, 2025 20:36 PM
views 45  views

कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने महामार्गालगत दुचाकीवर बसलेल्या शिक्षकाला मागाहून धडक दिली. या अपघातात विठ्ठल भिकाजी ढवण (४८, रा. साकेडी-वरचीवाडी) यांच्या मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-वाकाडवाडी रविवारी दुपारी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. कार चालकाने काही महिलांना धडक दिली असून त्यापैकी महिला जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी मनोज प्रभाकर गुरव (27) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक महेंद्र दिलीप पाटील (रा. दत्तनगर, डोंबिवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गालगत दुचाकीवर विठ्ठल ढवण बसले होते. त्याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या त्यांना मागावून धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. तसेच चार महिलांनाही धडक दिली. यात त्या जखमी झाल्या. मिनल मनोहर गवस (६३), शुभांगी शशिकांत गवस (५३), सुहासिनी चंद्रकांत दळवी (६५ सर्व रा. जानवली), विजया विजय जाधव (६४,फणसवाडी) या महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील सुहासिनी दळवी या गंभीर जखमी असल्याने त्यांना गोवा-बांबोळी येथील जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ढवण यांच्या पश्चात्त आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. याबाबत मनोज प्रभाकर गुरव (२७) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक महेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे करीत आहेत.