LIVE UPDATES

राष्टोळी दत्त मंदिराच्या नूतन बांधकामासाठी विशाल परब यांची आर्थिक मदत

देवस्थान समितीकडे मदतीचा धनादेश सुपूर्द; सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 13:22 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील राष्टोळी दत्त मंदिर देवस्थानच्या नूतन बांधकामासाठी भाजप युवा नेते श्री. विशाल परब यांनी आर्थिक मदत केली. मंदिराच्या विकासकामांना हातभार लागावा, या उद्देशाने त्यांनी ही मदत देवस्थान समितीकडे सुपूर्द केली.

ही आर्थिक मदत देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत यांच्याकडे रंगनाथ गवस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. मंदिराच्या नूतन बांधकामासाठी मिळालेल्या या सहकार्याबद्दल देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी विशाल परब यांचे आभार मानले.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचा प्रयत्न विशाल परब यांच्याकडून केला जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांना सहकार्य अशा विविध माध्यमातून ते योगदान देत असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत,  शानी बोर्डेकर, नगरसेवक समीर रेडकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष आनंद तळणकर,  बाबाजी डांगी ,वैभव रेडकर, ओंकार रेडकर,सागर नाईक, भिकाजी गावडे,विवेक नाईक, श्रीराम रेडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्टोळी दत्त मंदिराच्या नूतन बांधकामाला मिळालेल्या या आर्थिक सहकार्यामुळे मंदिराच्या विकासकामांना हातभार लागणार असून, देवस्थान समिती व ग्रामस्थांनी विशाल परब यांचे आभार व्यक्त केले.