LIVE UPDATES

विलास कुडाळकर यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 14, 2026 17:57 PM
views 29  views

कुडाळ : कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी आभार मानले आहेत. 

मालवणी भाषा साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारे आणि आपल्या भाषेचा अभिमान असणारे रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक, निर्माते कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मरणार्थ खासदार नारायण राणे यांनी नाट्यगृह मंजूर केले होते. हे नाट्यगृह त्यानंतर कुडाळ येथे उभारण्याचे प्रशासनाने ठरवले यासाठी कुडाळ नगरपंचायत या नाट्यगृहाची जबाबदार यंत्रणा आणि काम करणारी यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग होती. गेले काही वर्षे या नाट्यगृहाचे काम सुरू आहे या नाट्यगृहासाठी निधीची आवश्यकता होती. या नाट्यगृहामध्ये अजूनही अनेक कामे प्रलंबित आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे रंगमंचाचे काम. या नाट्यगृहाच्या प्रलंबित कामासंदर्भात आमदार निलेश राणे यांना सांगितल्यानंतर त्यांनी याची तात्काळ दखल घेतली. देऊ तो शब्द पूर्ण करू या त्यांच्या ब्रीदवाक्यप्रमाने त्यांनी कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी रुपये उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर करून दिला यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. हा निधी नाट्यगृहासाठी मिळवून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे आभार नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आहे.