LIVE UPDATES

आंबोली मुख्य धबधबा परिसरात कोसळले भलेमोठे दगड

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 14, 2026 12:16 PM
views 15296  views

सावंतवाडी : आंबोली घाटात मुख्य धबधबा परिसरात दगड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. वर्षा पर्यटनाला सुरूवात झालेली असताना घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांत भिती निर्माण झाली आहे.

आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या परिसरात हे दगड कोसळले. यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. येथील उपस्थितांनी रस्त्यावरील हे दगड बाजूला केला असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली. आज सकाळी ही घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडग्रस्त काही भागात दक्षता घेण्याबाबतचा स्पॉट पंचनामा नुकताच कोकणसादकडून करण्यात आला होता. यात संबंधित विभागाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आज दगड रस्त्यावर कोसळण्याचे पहायला मिळत आहे. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. मात्र, वर्षा पर्यटनासाठी विकेंडला आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.