
वेंगुर्ला : तालुक्यातील पाल ग्रामपंचायतची ग्रामसभा २७ ऑगस्ट रोजी सरपंच कावेरी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पाल विकास सोसायटी संचालक विलास अनंत गावडे यांची तंटामुकी अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच प्रीती गावडे, पंचायत अधिकारी अमर गाडेकर, सदस्य प्रदीप मुळीक, विनिता गावडे, स्नेहल पालकर, श्यामल केरकर, श्रीकांत गावडे, कृष्णा गावडे तसेच ग्रामस्थ दीपक गावडे, राजाराम गावडे, अंकुश गावडे, नारायण गावंडे, संदीप नाईक, पोलीस पाटील ऋतिका नाईक, सीआरपी सुचिता नाईक, आशा सेविका राजश्री पालकर यांच्यासहित ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.










