LIVE UPDATES

Sindhudurg Shivsena : विजय इंगळे यांची युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी निवड

आमदार निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 19:00 PM
views 39  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघ युवा सेना जिल्हाप्रमुखपदी विजय मऱ्याप्पा इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवासेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विजय इंगळे यांच्यावर शिवसेना पक्षाकडून ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांनी विजय इंगळे याना कोकण विभागाचे युवा सचिव विकास भरत गोगावले यांनी दिलेले नियुक्तीपत्र स्वहस्ते दिले. विजय इंगळे हे आमदार तथा माजी खासदार निलेश राणेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुपरिचित आहेत. 

शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि युवासेना कोकण विभाग सचिव विकास भरत गोगावले यांच्या सूचनेनुसार विजय इंगवले यांची कणकवली, देवगड, वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडीनंतर विजय इंगळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील युवासैनिकावर विश्वास ठेवून मला युवासेना जिल्हाप्रमुख-सिंधुदुर्ग (कणकवली, देवगड, वैभववाडी) या पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सिंधुदुर्गातील प्रत्येक तरुणाच्या न्यायासाठी मी अहोरात्र काम करेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात जिल्ह्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी ते सक्रियपणे काम करणार आहेत.