
पुणे : राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला .या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल १०७० स्पर्धक सहभागी झाले होते.
पुणे येथे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये वैभववाडीच्या श्रीमती गुरखे यांच्या गांडूळ खत या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्यांच्या विभागील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितपणे १० गावांमध्ये गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे उभारला आहे. या प्रकल्पासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली होती.अखेर या प्रकल्पाने राज्यस्तरावर बाजी मारली.गेल्या वर्षीही श्रीमती गुरखे यांनी राज्यस्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केला होता.
राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर श्रीमती गुरखे यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या विभागातील मधील सर्व सेविका व मदतनीस यांना दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प यशस्वी ठरला असे त्यांनी सांगितले.या यशासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, वैभववाडीचे तत्कालीन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.













