
वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समितीच्या भाजप, शिंदे शिवसेना व अपक्ष अशा ९ सदस्यांनी "वेंगुर्ला तालुका विकास आघाडी" गट आज स्थापन केला. तर गटनेतेपदी एकमताने भाजपचे म्हापण पं स सदस्य विष्णू उर्फ आपा फणसेकर यांची घटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना याबाबतचे पत्र सादर करण्यात आले.
भाजपचे विष्णू फणसेकर (म्हापण), शितल राऊत (वायंगणी), शंकर घारे (मातोंड), संकेत धुरी (आसोली), प्रियांका घाटवळ (रेडी) तर शिंदे शिवसेनेचे सचिन देसाई (परुळे), सुचिता वजराटकर (वजराट), साक्षी नार्वेकर (उभादांडा) व महायुती पुरस्कृत नितीन मांजरेकर (आडेली) या ९ सदस्यांनी हा वेंगुर्ला तालुका विकास आघाडी हा गट स्थापन केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी गटनेते विष्णू फणसेकर यांचा सन्मान केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, शिवसेनेचे सुरज परब, वसंत तांडेल, ज्ञानेश्वर केळजी आदी उपस्थित होते.













