
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी फलटण ते बरड दरम्यान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीत सहभाग घेत हरी नामाचा गरज केला. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, भाजप महिला जिल्हाध्यक्षा तथा माजी सदस्य श्वेता कोरगावकर, सदस्य सावी लोके, माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी बांधकाम सभापती बाळा जठार, माजी सदस्य सुधीर नकाशे, माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर आदी पदाधिकाऱ्यांनी दिंडीत भाग घेतला.
यावेळी त्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत काही अंतर वारीत पायी प्रवास केला. तसेच नंतर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. दरवर्षी शक्य होईल तसे हे पदाधिकारी वारीत सहभागी होतात असे यावेळी प्रितेश राऊळ यांनी सांगितले.










