LIVE UPDATES

कळणेत गाय व वासरु मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

ग्रामस्थ आणि गोरक्षकांची चौकशी मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 13:29 PM
views 124  views

दोडामार्ग : काही दिवसांपूर्वी मोरगाव येथे गायीवर बंधूकीची गोळी घालून हत्या केल्याची घटना ताजी असताना कळणे सडा येथे एक गाय व वासरु मृतावस्थेत आढळून आली. ती गाय व वासरू मेली होती की तिला मारून याठीकाणी टाकण्यात आले? अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. तरी या घटनेची चौकशी करून त्याचा तपास करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व गोरक्षकांमधून केली जातं आहे. 

   याबात अधिक माहिती अशी की कळणे सडा येथे स्थानिक ग्रामरस्थ अळमी शोधण्यासाठी सड्यावर फिरत होते. त्यावेळी त्यांना सड्यावर एक गाय व वासरू जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसले. जवळ जाऊन त्यांनी पाहिले असता ती गाय व वासरू मृत अवस्थेत निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी सरपंच अजित देसाई व इतर ग्रामस्थांना याची कल्पना दिली. सरपंच अजित देसाई व स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी गेले. गाय व वासरू एकाच ठिकाणी मृता अवस्थेत आढळल्याने त्या गाईचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, की त्यांना मारून आणून टाकले असा संशय स्थानिकांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा मारून त्या गाय व वासराला दफन केले. मात्र जे कोणी हे कृत्य केले त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.