
दोडामार्ग : दोडामार्ग आयी मार्गावर रविवारी सकाळी वस्तीगृहाजवळ एक भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. नगरपंचायत प्रशासन व स्थानिकांच्या मदत कार्याने ते झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. कसई दोडामार्गचे वसतिगृहाजवळ दोडामार्ग आयी मार्गावर सकाळी झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. ही घटना नगरपंचायत व स्थानिक ग्रामस्थ तसेच माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक समीर रेडकर, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, नगरपंचायत कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी यांनी स्थानिकांची मदत घेऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.










