LIVE UPDATES

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची स्थापना

अध्यक्षपदी जि. प. सदस्य सुजाता पडवळ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 12:39 PM
views 26  views

वेंगुर्ले : दिनांक १८ जून २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे जन आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. शासनाच्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या मा. श्रीमती सुजाता अजित पडवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. रवींद्र लहानु लिलके यांची सहअध्यक्ष म्हणून तर आरोग्य सहाय्यक व रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिव मा. दयानंद सोमा गवस यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

​या सभेला पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य (उभादांडा मतदारसंघ) संजय दत्ताराम गावडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद श्रीधर मोळके, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.सानिया हारूण खान, वरिष्ठ स्टाफ नर्स शिल्पा विजय आंबेकर, ग्रामपंचायत आरोग्य उपसमितीचे सभापती सचिन सुरेश नाईक, महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रिय पर्यवेक्षिका शर्मिष्ठा पांडुरंग सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रतिनिधी द्रौपदी अर्जुन नाईक, तालुकास्तरीय शिक्षण विभाग अधिकारी संतोष दत्ताराम गोसावी आणि तालुकास्तरीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी प्रितम कैवल्य पवार उपस्थित होते.

​यासोबतच विविध गावांतील सरपंच रश्मी रामचंद्र परब (तुळस), मयुरी महेश वडाचेपाटकर (मातोंड), रसिका रविंद्र केळुसकर (होडावडा), बाळा मधुकर जाधव (आसोली), शमिका शंकर बांदेकर (परबवाडा) आणि निलेश जयप्रकाश चमणकर (उभादांडा) यांनीही या सभेत सहभाग घेतला. रोटरी क्लबचे सदस्य स्वप्निल वासुदेव झांट्ये आणि स्वयंसेवी संस्थेचे आरोग्य विषयक कामकाज हाताळणारे प्रतिनिधी सचिन वासुदेव परुळकर हे देखील उपस्थित होते. या सभेला विशेष निमंत्रित म्हणून पंचायत समिती वेंगुर्लाचे सभापती शंकर शशिकांत घारे, क्षयरोगाने मुक्त झालेल्या जयमाला सुर्यकांत गावडे आणि बचत गट अध्यक्ष दिपीका राजाराम परब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.