
वेंगुर्ला : आगामी काळातील दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी तसेच भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ जलसंधारण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी लोकसहभागातून दोन वनराई व कच्चे बंधारे उभारण्यात आले.
पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच अडवून ते जमिनीत मुरवणे, जमिनीची धूप रोखणे तसेच विहिरींची भूजल पातळी वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून बंधारे उभारण्यात सहभाग घेतला.
यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, गट शिक्षण अधिकारी, सीआरपी शिला देऊलकर, कृषीसखी सुषमा गावडे, पशुसखी दिशा गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, अनिषा गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे आदी उपस्थित होते. सरपंच सत्यविजय रामकृष्ण गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे तसेच ग्रामपंचायत सदस्य सायमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सीमा गावडे, सुधाकर गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले.
यावेळी दीपक गावडे, अर्जुन गावडे, बाळा मुळीक, बाळकृष्ण अर्जुन गावडे, लक्ष्मण गावडे (बाळा), दीपक राजाराम गावडे, भाई गावडे, सिद्धू गावडे, कांता मुळीक, शैलू गावडे, सर्वेश गावडे, बाळकृष्ण गावडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच सत्यविजय गावडे यांनी आगामी काळातही अशाच प्रकारे आणखी बंधारे उभारून जलसंधारणाची चळवळ व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.










